जिज्ञासा म्हणजे नेमके काय?
जिज्ञासा ही मानवी मेंदूची सर्वांत मूलभूत, परंतु अत्यंत गुंतागुंतीची आणि उत्क्रांतीदृष्ट्या अत्यावश्यक अशी प्रवृत्ती मानली जाते. माणूस हा केवळ जगण्यासाठी लढणारा प्राणी नाही तर स्वतःला आणि विश्वाला समजून घेण्यासाठी सतत धडपडणारा जीव आहे. ‘जिज्ञासा’ ह्या शब्दाचा अर्थ जरी भाषिक पातळीवर जिद्द, ज्ञान आणि साहस ह्यांची एकत्रित अभिव्यक्ति वाटत असला, तरी मेंदूविज्ञान, संज्ञानशास्त्र, उत्क्रांतिविज्ञान आणि मानसशास्त्र …